छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): इस्कॉन मधुवन येथे रविवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या मूल्य संवर्धन शिक्षण प्रतियोगिता स्पर्धेचा वितरण पारितोषिक सोहळा उत्साहात पार पडला. ६ हजार विद्यार्थ्यांच्या सहभागासह ही स्पर्धा पार पडली.
या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर, इस्कॉनचे प्रतिनिधी कनाई ठाकूर प्रभू, इस्कॉन मधुवनचे अध्यक्ष डॉ. रामलक्ष्मण प्रभू, तसेच या स्पर्धेचे संयोजक सचिनंदन भगवान प्रभू आणि सनक सनातन प्रभू उपस्थित होते. जुलै व ऑगस्टमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत कन्नड, सिल्लोड, पैठण, वैजापूर आणि भोकरदन या पाच तालुक्यांतील १०२ शाळांमधील ६२०० हून अधिक विद्यार्थ्यांनी
सहभाग नोंदविला. शालेय पातळीवरील विजेत्यांना गरम थंड पाण्याची बाटली, जिल्हास्तरावरील तिसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यांना आधुनिक मनगटी घड्याळ, दुसऱ्या क्रमांकाच्या विजेत्यांना सायकल आणि जिल्ह्यात प्रथम आलेल्या विजेत्यांना वीजेवर चालणारी सायकल देण्यात आली. प्रत्येक विजेत्याला पदक, प्रल्हाद महाराजांची शिकवण हे पुस्तक देऊन गौरविण्यात आले. जिल्ह्यात पहिले तीन क्रमांक मिळवणाऱ्या धीरज, श्रेयस आणि समृद्धी या विद्यार्थ्यांना आगामी काळात बंगळुरू येथील भारतीय अवकाश संशोधन संस्थेत शैक्षणिक सहलीची संधी देण्यात येणार आहे. पोलीस उपआयुक्त पंकज अतुलकर यांनी मार्गदर्शन केले. कनाई ठाकूर प्रभू यांनी भगवद्गीतेचे जागतिक महत्त्व सांगितले.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












